गंगाखेड परभणी महामार्गावरील खळी येथे उसाला एफ आर पी प्रमाणे भाव व उचल मिळावी यासाठी ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने 15 डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते याप्रकरणी बुधवारी गंगाखेड ठाण्यात आंदोलकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आंदोलनकर त्यांना आंदोलन न करण्याची नोटीस देण्यात आली होती या नोटिसीचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी 75 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व इतर दहा ते पंधरा जणांचा समावेश आहे.