आज दिनांक 26 डिसेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील बेलोरा येथे किरकोळ वादातून झालेल्या भांडणात सख्ख्या भावानेच भावाला भाजी कापण्याचा चाकू मारून जखमी केल्याची घटना दिनांक 24 डिसेंबरला रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी घडली आहे. याबाबतीत गणेश पुंजाराम शिंदे राहणार बेलोरा यांनी दिनांक 25 डिसेंबरला बारा वाजून 18 मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी उमेश पुंजाराम शिंदे वर गुन्हा दाखल केला आहे