कन्नड: हतनूर येथे सर्पदंश झाल्याने तीन वर्षीय चिमूकलीचा मृत्यू
अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलीला सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील हतनूर गावात घडली आहे. आर्या आकाश कुंठे असे मृत मुलीचे नाव आहे.आर्याचे आजोबा पोपट कुंठे आणि वडील आकाश यांनी तिला तातडीने हतनूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, सुटीमुळे केंद्र बंद होते. आर्याला तत्काळ छत्रपती संभाजीनगरला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.अवघ्या काही दिवसांपूर्वी २४ सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस होता.