दारव्हा: नगर परिषदेकडे अपंग निधी वाटपाबाबत उबाठा शिवसेनेचे निवेदन
नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आर्थिक वर्ष 2024-25 मधील अपंग बांधवांसाठी राखीव निधीच्या वाटपाबाबत दि. ६ ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता दरम्यान निवेदन दिले आहे. शासन नियमानुसार नगर परिषदेच्या उत्पन्नातील ५% निधी अपंगांसाठी राखून ठेवणे बंधनकारक असताना, अद्याप हा निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.