दापोली: वानौशी येथे निवृत्त सैनिकाच्या घरातून सुमारे दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
दापोली तालुक्यातील वनौषी वानेवाडी येथील 83 वर्षीय सेवानिवृत्त सैनिक शिवराम बाबुराव पाटणे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी 26 मे ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.