कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जनता संवादाचे आयोजन
आज मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित 'जनता संवाद' कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मुंबईतील पक्ष कार्यालयात राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व शेतकरी बांधव, कृषी नवउद्योजक, नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. या संवादादरम्यान उपस्थितांनी मांडलेल्या विविध समस्या व मागण्या मंत्री महोदयांनी अत्यंत लक्षपूर्वक ऐकल्या. त्यावर तात्काळ कृती करत, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.