शहरातील सिंगलटोली परिसरातील रहिवासी गोपाल शर्मा वय 23 वर्ष या तरुणाचा दिनांक 30 डिसेंबर रोजी मंगळवार ला सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. घरच्यांनी त्याला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉ. मनोज अग्रवाल यांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण करू शकले नाही. या घटने संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मिक मुत्यूची नोंद घेतली आहे. तपास सुरू आहे.