खुलताबाद: खुलताबाद नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया सुरू,पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
खुलताबाद नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया आज दि १० नोव्हेंबर रोजी औपचारिकपणे सुरू झाली असून तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन सज्ज झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती कंकाळ यांनी दुपारी साडे चार वाजता दिली.दरम्यान, नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे.