वेळेच्या प्रवाहात हरवलेल्या शालेय जीवनाच्या आठवणींना पुन्हा जिवंत करणारा एक हृदयस्पर्शी सोहळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, दारव्हा येथे रंगला. १९९४ च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तब्बल ३१ वर्षांनंतर एकत्र आले आणि ९ जानेवारी रोजी आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात त्यांनी आपल्या बालपणीच्या मैत्रीला नव्याने उजाळा दिला. हा क्षण केवळ एक मेळावा नव्हता, तर आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यांवर पोहोचलेल्या मित्र-मैत्रिणींच्या भावना उफाळून आल्या आणि डोळे पाणावले.