पुणे शहर: नवले पुलाजवळ गौतमी पाटीलच्या गाडीचा भीषण अपघात; रिक्षाला जोरदार धडक
नवले ब्रिज परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या गाडीचा शनिवारी वडगाव पुलाजवळ अपघात झाला. या अपघातात रिक्षाला जोरदार धडक बसून रिक्षाचालक आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.