वर्धा: वर्धा आजी - आजोबा दिवस व दिवाळी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन
Wardha, Wardha | Oct 18, 2025 सेंट जॉन्स स्कूल, अल्लीपूर येथे दिवाळी निमित्त मोठया उत्सवात दिवाळी व आजी -आजोबा दिवस म्हणजेच ग्रँडपेरेंट्स डे साजरा करण्यात आला. सर्व प्रथम छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व आजी आजोबा यांचे फुलांनी स्वागत केले. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये विविध नृत्य व दिवाळीवर आधारित नाटिका सादर करून सर्व आजी - आजोबा यांचे मनोरंजन केले. तसेच आजी आजोबांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.