सावंतवाडी: भविष्य निर्वाह निधीपासून वंचित राहिलेल्या सावंतवाडी नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत "काम बंद" आंदोलन सुरू
तब्बल चार वर्षे भविष्य निर्वाह निधीपासून वंचित राहिलेल्या सावंतवाडी नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सोमवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 पासून बेमुदत "काम बंद" आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आमचा भविष्य निर्वाह निधी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान या निधी पोटी तटविण्यात आलेल्या निधीचा आकडा 6 लाख 56 हजारचा असून या अपहाराला सर्वस्वी ठेकेदार जबाबदार आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.