चामोर्शी: एक गाव, दोन गणपती, माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या उपस्थित रक्तदान शिबिर आणि सामाजिक उपक्रमाचे कौतुक .
व्याहाड बुज : आज दिनांक १५ सप्टेंबरला माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद मस्कऱ्या गणेश मंडळांना भेट देऊन गणेशाचे दर्शन घेतले. या दोन्ही मंडळांनी 'एक गाव, दोन गणपती' ही अनोखी परंपरा जपताना रक्तदान शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. या कार्याचे कौतुक करताना डॉ. अशोक नेते यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नसून तो सामाजिक संदेश देण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. त्यांनी दोन्ही मंडळांच्या कार्याला 'आदर्शवत' म्हटले. या कार