महाड: माणगाव तालुक्यातील बाजारपेठेत नागरिक व व्यापाऱ्यांशी खासदार सुनील तटकरे यांनी साधला संवाद
Mahad, Raigad | Sep 22, 2025 आज नवरात्रीच्या पावन व मंगलमय पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली जीएसटी दरकपात ही स्वयंभू भारत घडविण्यासाठीचे एक पाऊल आहे. ही दरकपात केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर राष्ट्रीय विकासाच्या दिशेनेही एक ठोस वाटचाल ठरणार आहे. जीएसटी बचत उत्सव स्वदेशी अभियान अंतर्गत आज सोमवारी दुपारी २ च्या सुमारास माणगाव तालुक्यातील बाजारपेठेत नागरिक व व्यापाऱ्यांशी खासदार सुनील तटकरे यांनी संवाद साधला. यावेळी अनेक दुकानदार, उद्योजक, सामान्य नागरिकांशी चर्चा करून या निर्णयाची चर्चा केली.