जामखेड: जामखेड नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त...राष्ट्रवादीसह महिला आक्रमक..!
जामखेड शहरातील सर्व भागांना ठिकठिकाणी अस्वच्छता, पावसाच्या पाण्याने साचलेले डबके यामुळे डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आठ दिवसांपासून पाणीपुरवठा, पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचा बोल गटारीसह डबक्यात असल्याने वाढलेली रोगराई यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी समस्या मांडून नगरपरिषदेचं पितळ उघडं पाडलं आहे. जामखेड शहरात मागील काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत जामखेड शहरातील सदाफुले वस्ती येथ