नांदुरा: पुनर्वशीत टाकळी वतपाळ गावांच्या नागरी सुविधा पूर्ण करा अन्यथा;गावकरी करणार जलसमाधी आंदोलन गावकऱ्यांचा– गावकऱ्यांचा इशारा
टाकळी वतपाळ हे गाव जिगाव प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पुनर्वशीत गावठाण असून या गावात अजून सुद्धा नागरी सुविधांचे काम अपूर्णच आहे. नागरी सुविधांचे काम पूर्ण करा अन्यथा पूर्णा नदी पात्रात जलसमाधी करणार असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.