सातारा: गोडोली येथे वडापावच्या दुकानावर खंडणी मागणाऱ्या तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Nov 28, 2025 गोडोली, सातारा येथे दि. २५ रोजी वडापाव सेंटरवर जावून महिन्याला दहा हजार द्या नाही तर दुकान चालू देणार नाही, असे धमकावत दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सरिता जगदीश जाधव रा. देगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २५ रोजी गोडोली हद्दीत अजंठा चौकात वडापाव सेंटर आहे. याठिकाणी रसिक धोत्रे रा. इंदिरानगर, झोपडपट्टी, सातारा हा दोन मित्रांना मोटारसायकलवरून घेवून त्याठिकाणी आला. त्यांनी दुकान सुरू ठेवायचे असेल तर महिन्याला दहा हप्ता द्या.