धुळे: लळिंग घाटातून मालेगावच्या दुचाकी चोरट्याला मोहाडी नगर पोलिसांनी घेतले ताब्यात, चार दुचाकी जप्त
Dhule, Dhule | Sep 15, 2025 धुळे मोहाडी नगर पोलिसांनी लळिंग घाटातून मालेगावचा सराईत दुचाकी चोरटा तोहिद उर्फ भुऱ्या अहमद (३०) याला ताब्यात घेऊन चार दुचाकी हस्तगत केल्या. अवधान येथून चोरी झालेल्या मोटारसायकल प्रकरणी सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या आधारे २४ तासांत अटक करण्यात आली. आरोपीने धुळे शहरातून तीन तर सटाणा तालुक्यातून एक अशी चार वाहने चोरी केल्याची कबुली दिली. कारवाई पीआय शिल्पा पाटील यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली.