साकोली: नागझिरा रोडवरील गोपाळ वस्तीवर शामरावबापू कापगते प्रतिष्ठान व भटके विमुक्त संघटने द्वारे स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन
साकोली येथील नागझिरा रोडवरील गोपाळ वस्तीवर शामराव बापू कापगते प्रतिष्ठान साकोली व भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांत ,विश्व हिंदू परिषद शाखा साकोली यांच्या वतीने रविवार दि 2 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ हेमकृष्ण कापगते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.मा. आमदार डॉ हेमकृष्ण कापगते डॉ शंकुतला कापगते, प्रल्हाद पटले,राहूल आवरकर,दिनेश कापगते यांची प्रमुख उपस्थित होते