जालना: बातमी प्रसिद्धीचा राग मनात धरुन पत्रकारास मारहाण; पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीसीएमची मागणी
Jalna, Jalna | Oct 29, 2025 जालना येथील पत्रकार विष्णू कदम यांना बातमी प्रसिद्धीचा राग मना धरुन राम सावंत, हर्षवर्धन सावंत, राम कुराडे व इतर चार-पाच जणांनी मारहाण केली. कदम यांनी याबाबत रितसर कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आजपावेतो गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके व पदाधिकारी तसेच पत्रकारांनी बुधवार दि.29 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वा.अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.