देसाईगंज वडसा: देसाईगंज येथे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ
“स्वस्थ नारी म्हणजेच सशक्त समाजाची पायाभरणी” या उदात्त संकल्पनेवर आधारित ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या उपक्रमाचे उद्घाटन आज आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय, देसाईगंज येथे उत्साहात पार पडले.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तसेच स्थानिक जनप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गटाच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.