शिरपूर: माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते जनकव्हीला येथे शहर युवा मोर्चा व महिला आघाडीच्या अध्यक्षांना नियुक्तीपत्र
Shirpur, Dhule | Oct 10, 2025 भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर युवा मोर्चा अध्यक्षपदी संदिप माळी यांची निवड जाहीर करण्यात आली असून जनक व्हीला या माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या निवासस्थानी व उपस्थितीत भाजपा शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.तसेच भाजपा शहर महिला आघाडी अध्यक्षपदी डॉ.जयश्री मनोज निकम यांची निवड करण्यात आली असून त्यांना लवकरच नियुक्तीपत्र बहाल करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये माहिती देण्यात आली.