भंडारा शहरातील नाग मंदिर परिसरात सायंकाळच्या सुमारास एका भरधाव मारुती सुझुकी कारने सायकलला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय तरुणी जखमी झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी कु. मयुरी संजय जमजार (वय २५, रा. खुर्शीपार) ही १७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आपली मैत्रीण प्राची आठवले हिच्यासह मैदानावर सराव करून सायकलने घरी परतत असताना, शितला माता मंदिर ते खामतलाव मार्गावरील नाग मंदिरासमोर मागून येणाऱ्या सिल्व्हर रंगाच्या चारचाकी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगाने व निष्काळजीपणाने...