समुद्रपूर: गिरड येथे मिशन १०हजार वृक्ष लागवड संदर्भात श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरात पार पडली नियोजन बैठक
गिरड येथिल निर्सग प्रेमीच्या संकल्पनेतून वाढत्या प्रदूषणावर मात करून निर्सगाचा समतोल ठेवण्यासाठी येणाऱ्या दिवसात मिशन १० हजार वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येणार असून यासाठी श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरात शनिवारी सायंकाळी ७ वाजता नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला हिंगणघाट येथील निसर्ग मित्र आशिष भोयर,व अभिजी डाखोरे सर यांनी महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले.या नियोजन बैठकीला गिरड येथील निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुढील वृक्ष जनआंदोलन मोहिमेची दिशा ठरवली