धुळे: अप्पर जिल्हाधिकारी शरद पवारांचे कडक आदेश; धुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कलम १६३ लागू
Dhule, Dhule | Dec 1, 2025 धुळे जिल्ह्यात पिंपळनेर, शिरपूर-वरवाडे नगरपरिषद व शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी शरद पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये कडक मनाई आदेश लागू केले आहेत. 2 डिसेंबरच्या मतदानापासून 3 डिसेंबरच्या मतमोजणीपर्यंत बुथ, प्रचार साहित्य, मोबाईल, कॅमेरे, वायरलेस सेट आणि शस्त्रांवर बंदी राहील. मतदान व मतमोजणी केंद्रांच्या परिसरात विशेष निर्बंध लागू राहणार आहेत.