मुर्तीजापूर: मुर्तिजापूर शहरात नवदुर्गा व शारदा देवी विसर्जन शांततेत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्याकडून चोख बंदोबस्त
गेल्या दहा दिवस शहरात भक्तिमय वातावरणात आदिशक्तींची भक्ती भावाने पूजा अर्चना केली दरम्यान शुक्रवार ३ ऑक्टोंबर सकाळपासून ते शनिवार ४ ऑक्टोबर रात्री दहा वाजेपर्यंत अतिशय धार्मिक व उत्साह पूर्ण वातावरणात बँड पथक,पारंपारिक भजन मंडळ,गरबा,लेझीम व डीजेच्या माध्यमातून नवदुर्गा व शारदा देवी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावला होता.