अंबड पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष घोडके यांनी आज दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळीसाडे सात वाजता दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 21 डिसेंबर रोजी रात्र गस्त दरम्यान गोवश घेऊन जाणारे वाहन पकडले. या प्रकरणी अंबड पोलिसात 4जणां विरुद्ध अंबड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यात दोघा आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावणी आली असल्याची माहिती अंबड ठाणेदार संतोष घोडके यांनी दिली आहे.