रिक्षा-दुचाकीच्या धडकेत रिक्षा उलटून दोन्ही वाहनातील 4 जण जखमी झाल्याची घटना रावणवाडी येथील बीर्सी टर्निंग पॉईंट जवळ दि.22 नोव्हें. 4:15 वा.दरम्यान घडली.फिर्यादी अरविंद मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार 4:15 वाजता च्या सुमारास अरविंद यांचे भाऊ शिरीष मेश्राम व त्यांची पत्नी कामठा येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून ऑटो रिक्षाने गोंदियाकडे जात होते.दरम्यान कामठा रावणवाडी मार्गावरील बिर्सी टर्निंग पॉईंटवर रिक्षा चालक डेव्हिड डोंगरे यांनी आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून अपघात झाला.