लाखनी शहरातील गडेगाव परिसरातील अविघ्न सोसायटीमध्ये राहणारे जगदीश भोजराज टहिल्याणी (६४) यांची ३५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होन्डा ॲक्टिवा (क्र. MH 36 S 2268) अज्ञात चोरट्याने घरासमोरून लंपास केली आहे. फिर्यादीने दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता आपली गाडी घराच्या गेटसमोर हँडल लॉक करून उभी केली होती, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजेपर्यंत ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.