दिग्रस शहरासह परिसरातील सहकारी शिक्षक, कर्मचारी आणि नातेवाईकांना गुंतवणुकीवर १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा दिग्रस तालुक्यातील इसापूरचा केंद्रप्रमुख गिरीश किसनराव दुधे याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्याच्यासह अन्य ४ आरोपींविरुद्ध दि. ६ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.