उदगीर शहरातील तीन प्रभागातील मतदान हे न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आले होते, स्थगित करण्यात आलेल्या प्रभागातील मतदान २० डिसेंबर रोजी पार पडणार असून प्रचार करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत,प्रत्येक पक्षाने आपआपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असून प्रभागात कॉर्नर सभा,बैठका, मतदाराच्या गाठीभेटी, प्रचार रॅलीची रणधुमाळी सुरू आहे, काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक ८ अ,१५ ब,प्रभाग क्रमांक १६ ब मध्ये प्रचार रॅली काढली