देशात कुत्रा चावल्याने अनेक ठिकाणी नागरिक हे त्रस्त तर कुठे एखाद्याचा मृत्यू होत असून याकडे लक्ष वेधत आजरोजी दुपारी 12:25 च्या सुमारास राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेबीज लसीबाबत कोणते उपाय व योजना राबविण्यात येत आहेत या संदर्भात खा. अजित गोपछडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याच प्रश्नाच्या अनुषंगाने लगेचच त्यांना उत्तर देखील देण्यात आले असून मा. मंत्री महोदयांनी केंद्र सरकारची भूमिका देखील मांडले आहेत.