पाथर्डी: पालिका निवडणूकीसाठी १० नोव्हेंबर पासून एक खिडकी योजना : निवडणूक अधिकारी प्रसाद मते
आगामी नगरपरिषद निवडणूक संदर्भात अर्ज स्वीकारण्यापासून ते मतमोजणी होईपर्यंत सर्व प्रकिया वीर सावरकर मैदानावरील नगरपरिषदेच्या नवीन इमारतीत पार पडणार आहे. १० नोव्हेंबर पासून एक खिडकी योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या परवानग्या मिळणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद मते यांनी दिली