धुळे: जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून 'स्वच्छता ही सेवा' पंधरवडा; जी.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजीज शेख यांची माहिती
Dhule, Dhule | Sep 16, 2025 स्वच्छ भारत मिशनअंतर्गत धुळे जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान 'स्वच्छोत्सव' पंधरवडा साजरा होणार आहे. जिल्हा सीईओ अजीज शेख यांनी नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले. यामध्ये सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, शून्य कचरा उत्सव, विशेष ग्रामसभा यांचा समावेश आहे. २५ सप्टेंबर रोजी 'एक दिवस-एक तास-एक सोबत' श्रमदान होणार असून या अभियानासाठी नागरिक, संस्था, शाळा-महाविद्यालये व बचत गटांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.