पुसद: मधुकर नगर मध्ये लोखंडी मूठ असलेला सुरा घेऊन दहशत निर्माण करणारा इसमावर गुन्हा दाखल
वसंत नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या मधुकर नगर येथे दिनांक ६ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी एका युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून लोखंडी मूठ असलेला सुरा जप्त केला आहे. सदर इसमाचे नाव राजु अशोक चांदने असून याच्या विरोधात वसंत नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.