घाटंजी: अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म,तालुक्यातील एका गावातील घटना
एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमात अडकवून तिच्यावर वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याची धक्कादायक घटना घाटंजी तालुक्यातील एका गावामध्ये घडली.पिडीतेला प्रसूती वेदना होऊ लागल्यानंतर नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले तेव्हा पिडीतिने एका बाळाला जन्म दिला.अल्पवयीन मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे शासकीय दवाखान्यांमध्ये दाखल केले.याप्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध घाटंजी पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले.