बिबट्याची भीती कशी करू शेती…?” असा प्रश्न उपस्थित करत खर्दे परिसरातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या रात्रीच्या वीजपुरवठ्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शिरपूर येथील महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन देत रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेऐवजी दिवसा वीजपुरवठा द्यावा,अशी ठाम मागणी केली आहे.