राहुरी: वळण येथे विषारी सर्प आढळून आल्याने घबराहट, सर्पमित्राने सिताबिने पकडून
राहुरी तालुक्यातील वळण येथील हनुमान मंदिराच्या सभागृहासमोर आज सोमवारी रात्रीच्या दरम्यान एक विषारी सर्प आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी हा सर्प आढळून आल्याने एकच पळापळ झाली. त्यानंतर येथीलच सर्पमित्र रोहित गांगुर्डे यांनी या विषारी सापास मोठ्या शितापीने पकडून निसर्ग सानिध्यात सोडले आहे.त्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निष्वास सोडला.