विक्रमगड: जव्हार येथे शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जव्हार येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभागनिहाय उमेदवार चाचपणी, पक्षबांधणी, संघटनात्मक बांधणी या विषयांवर देखील यावेळी चर्चा करत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे नेते संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, आमदार विलास तरे, आमदार शांताराम मोरे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण आदिसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.