रावेर: टेंभी या गावातील पशुपालकाची ५० हजार रुपये किमतीची म्हैस अज्ञात आजारामुळे दगावली, गावात उडाली खळबळ
Raver, Jalgaon | Nov 18, 2025 निमगाव व टेंभी या गावात यापूर्वी देखील मागील महिन्यात अज्ञात आजारामुळे पाच जनावर दगावली होती तर अनेक जनावर आजारी होती त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र पुन्हा गावात मंगळवारी अनिल पाटील यांची ५० हजार रुपये किमतीची म्हैस दगावली आहे अज्ञात आजारामुळे म्हैस दगावली असून अजून काही जनावरे हे आजारी आहेत त्यामुळे गावात खळखळून आली आहे पशुसंवर्धन विभाग आता पथकासह गावात दाखल होत आहे