राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी जळगावात आलेले शिक्षक संदीप प्रल्हाद पवार (४२, मूळ रा. बिलदी, ता. पाचोरा, ह.मु. पाचोरा) यांचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मू.जे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली.