लांजा: तालुक्यातील वाडीलिंबू- वाघ्रट ग्रुप ग्रामपंचायतमध्ये दारूबंदीचा ठराव
रत्नागिरी जिल्ह्यामधील लांजा तालुक्यातील वाडीलिंबू- वाघट ग्रुप ग्रामपंचायत मध्ये तब्बल दोन दशकांपासून दारूमुळे सुरू असलेल्या त्रासाला महिलांनी पूर्णविराम दिला आहे. स्वातंत्र्यदिनी गावातील ३०८ महिलांच्या उपस्थितीत सर्वांनुमते दारूबंदीचा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.