भावेश विनोद खोडनकर वय 13 वर्ष, रा. यशवंत बाबा झोपडपट्टी वार्ड क्रमांक दोन सावनेर हा आठव्या वर्गात भालेराव हायस्कूल सावनेर येथे शिकत असून तो शाळेमधून बेपत्ता झाला आहे त्याचे आई-वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात भावेश हा दिनांक 13 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे शाळेच्या गुरुकृपा नावाच्या बसने शाळेत गेला परंतु तो सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास घरी आलेला नाही याबाबत भावेशची आई बबीता हिने आपले पती विनोद सोबत जाऊन सावनेर पोलिसात तक्रार केली असून याबाबत सावनेर पोलीस तपास करीत आहे