पंढरपूर: पंढरपूरला पुन्हा पुराचा धोका, चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरांना पाण्याचा वेढा
उजनी आणि वीर ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरल्याने दोन्ही धरणांतून अनुक्रमे भीमा आणि निरा नदीत मोठा विसर्ग सोडण्यात येत आहे. हे दोन्ही विसर्ग संगम येथे एकत्रित येतात. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदीला पुन्हा एकदा पूर येणार आहे. चंद्रभागा तीरावरील विविध मंदिरे, समाधी यांना पुन्हा पुराचा वेढा पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. उजनी न भीमा नदीपात्रात सोमवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता एक लाख क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.