धरणगाव नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी पक्षाच्या एका नेत्याने नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराबद्दल अतिशय खालच्या स्तराचे, बदनामीकारक आणि भावना दुखावणारे शब्द वापरल्याबद्दल संबंधित उमेदवाराच्या समर्थकांनी गुरूवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.