बुलढाणा: परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतमालाचे तत्काळ पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
गेल्या आठवड्याभरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस सतत पडत आहे. शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात पावस झाल्यामुळे कपाशी, तूर, हरभरा, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आहेत.