चंद्रपूर: महात्मा गांधी जयंती निमित्त चंद्रपूर शहरातील गांधी चौकातून निघाली सेवाग्रामपर्यंत बाईक रॅली,खा. धानोरकर यांची उपस्थिती
महात्मा गांधी जयंतीनिमित्त ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस, चंद्रपूर यांच्या वतीने "गांधीजी के रास्ते" या संकल्पनेतून एक भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात चंद्रपूर येथील गांधी चौकातून झाली व सेवाग्राम येथे तिचा समारोप होणार आहे. सत्य व अहिंसेचा संदेश समाजात पोहोचवणे तसेच गांधीजींच्या विचारांचे स्मरण करून तरुण पिढीला त्यांच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व पटवून देणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.