तळा: तळा:तळा बाजारपेठ येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळा पोलिसांनी काढला रूटमार्च.
Tala, Raigad | Apr 9, 2024 तळा शहरातील तळा बाजारपेठ येथे मंगळवार दि.९ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळा पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा रूटमार्च काढण्यात आला होता. या रूटमार्च मध्ये तळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांसह माणगाव आरसिपी प्लाटूनचे ३५ जवान सहभागी झाले होते.