पुणे शहर: पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदवून घ्या, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन
Pune City, Pune | Sep 30, 2025 पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी - नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार नोंदणीची सुरुवात झाली आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.