धुळे: देवपूर प्रभात नगर वळण रस्त्यावर धुम स्टाईलने महिलेच्या खांद्यावरील पर्स चोरट्यांनी केली लंपास देवपूर पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 29, 2025 धुळे देवपूर परिसरात धूम स्टाईल चोरी करणारे चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शहरातील देवपूर प्रभात नगर वळण रस्त्यावर धूम स्टाईल महिलेच्या खांद्यावरील पर्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडलेली आहे.अशी माहिती 29 नोव्हेंबर शनिवारी सकाळी नऊ वाजून 39 मिनिटांच्या दरम्यान देवपूर पोलीसांनी दिली आहे. शहरातील देवपूर पांझरा नदी किनारील प्रभात नगर वळण रस्त्यावर 12 नोव्हेंबर भर दुपारच्या वेळी साडेतीन वाजेच्या दरम्यान रंजना प्रशांत भलकार महिला वय 34 पायी चालत जात असताना याच दरम्यान दोन जण